भोंग्यांसंदर्भात पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांनी धोरण ठरवावे ! – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
१-२ दिवसांत धोरण ठरवण्यात येणार !
प्रार्थनास्थळांवरील अवैध भोंग्यांवर कारवाई करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही सरकारने या आदेशाचे पालन का केले नाही, यावर गृहमंत्री काही भाष्य का करत नाहीत ?
मुंबई – भोंग्यांसदर्भात एकत्रितपणे धोरण ठरवण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. गृहमंत्री म्हणाले, ‘‘पुढील एक ते दोन दिवसांत भोंग्यांसंदर्भात धोरण ठरवण्यात येणार आहे. याविषयी मुंबईसह संपूर्ण राज्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल. कुणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये. जातीय तेढ निर्माण करणारी व्यक्ती अथवा संघटना यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.’’
भोंग्याच्या संदर्भात राज्याचे पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त हे दोघेही एकत्र येऊन राज्यासाठी एकत्रित असे धोरण ठरवतील आणि ते धोरण संपूर्ण राज्यासाठी जाहीर केले जाईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. pic.twitter.com/iNiX5Eu1CC
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) April 18, 2022
भोंग्यांच्या सूत्रावरून राज्यात मनसे आक्रमक झाली आहे. त्यामुळे राज्यातील प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यासाठी अनुमती घेणे अनिवार्य करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.