राष्ट्राध्यपदाच्या उमेदवार मरीन ली पेन यांच्यावर आर्थिक अपव्यवहाराचे आरोप !
फ्रान्समधील राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक
पॅरिस (फ्रान्स) – फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचे वारे वहात असतांना सध्याचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या प्रतिस्पर्धी आणि कट्टर उजव्या विचारसरणीच्या मरीन ली पेन यांच्यावर आर्थिक अपव्यवहारांचे आरोप होत आहेत. ‘नॅशनल रॅली’ पक्षाच्या अध्यक्षा असलेल्या मरीन ली पेन अन् त्यांचे सहकारी हे युरोपियन युनियनच्या संसदेत कार्यरत असतांना त्यांनी ६ लाख २० सहस्र युरोचा अपव्यवहार केला, असे तेथील ‘मिडियापार्ट’ नावाच्या अन्वेषण करणार्या एका आस्थापनाने म्हटले आहे. वैयक्तिक कामांसाठी जरी नसले, तरी पक्षाच्या खर्चासाठी हा निधी वापरला गेल्याचे आस्थापनाचे म्हणणे आहे.
A Week Before France Election, Globalists at EU Accuse Marine Le Pen and Her Father of Embezzling $650,000 The tactics are the same around the world. The https://t.co/fEVwVK9DKr #politics
— World News Guru (@worldnews_guru) April 18, 2022
मरीन ली पेन या इस्लामविरोधी नेत्या म्हणून ओळखल्या जातात. ‘२४ एप्रिल या दिवशी होणार्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे आरोप राजकीय स्वरूपाचे आहेत’, अशी चर्चा फ्रान्समध्ये होत आहे.