देहलीतील दंगलग्रस्त जहांगीरपुरी येथे चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांची दगडफेक !
यातून लक्षात येते की, धर्मांधांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही ! येथे २ दिवसांपूर्वी दंगल होऊनही ते पुन्हा पोलिसांवर दगडफेक करण्यास सिद्ध आहेत. यातून जहांगीरपुरी भारतात नसून पाकिस्तानमध्ये आहे, असेच लक्षात येते ! हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक
नवी देहली – येथील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या वेळी मशिदीवरून झालेल्या आक्रमणानंतर पोलीस १८ एप्रिल या दिवशी चौकशीसाठी गेले असता त्यांच्यावर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यामुळे येथे पुन्हा तणाव निर्माण झाला. आक्रमणाच्या वेळी सोनू चिकना याने मिरवणुकर गोळीबार केला होता. त्याच्या पत्नीची चौकशी करण्यासाठी पोलीस जहांगीरपुरी येथे गेले होते. तेव्हा धर्मांधांनी घराच्या छतावरून त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. नंतर पोलिसांनी स्थिती नियंत्रणात आणली. आतापर्यंत या हिंसाचाराच्या प्रकरणी २३ जणांना अटक करण्यात आली आहे. यात २ अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
Delhi: Fresh tension erupts Jahangirpuri as stones thrown at police | Communal riots | Oneindia Newshttps://t.co/2VuSCW2Dy7 #CommunalViolenceinDelhi #HanumanJayantiprocession pic.twitter.com/FWfZ5MLno0
— Oneindia News (@Oneindia) April 18, 2022
मशिदीवर भगवा झेंडा लावल्यामुळे दंगल झाल्याचा दावा खोटा ! – देहली पोलीस
जहांगीरपुरीची दंगल मिरवणुकीतील लोकांनी मशिदीवर भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न केल्यामुळे उसळली, असा दावा करण्यात येत आहे. यावर देहली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी पत्रकार परिषदेमध्येच स्पष्ट केले की, मशिदीवर भगवा झेंडा लावण्याचे सूत्र चुकीचे आहे. एका क्षुल्लक कारणामुळे येथे वाद चालू झाला आणि नंतर दंगल उसळली. लोकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये. आम्ही सामाजिक माध्यमांवरही लक्ष ठेवत आहोत. ‘चुकीची माहिती पसरवणार्यांवर कारवाई केली जाईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.