नाशिक येथे मशिदीच्या १०० मीटर परिसरात आणि अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यास बंदी !
पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचे आदेश !
नाशिक – येथील शहरामध्ये कुठल्याही मशिदीच्या १०० मीटर परिसरात आणि अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी भोंग्यांविषयी आदेश जारी केला आहे. आदेशानुसार सर्व धार्मिक स्थळांना भोंगे लावण्यासाठी अनुमती घेणे बंधनकारक असणार आहे. धार्मिक स्थळांनी ३ मेपर्यंत भोंग्यांसाठी अनुमती घ्यावी, असे आदेश नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. ‘अनुमती न घेतलेल्या संबंधित अनधिकृत भोंग्यांवर कारवाई केली जाईल, तसेच मशिदीत अजान होण्याच्या १५ मिनिटे आधी हनुमान चालिसा लावता येईल’, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
मस्जिद के 100 मीटर दायरे और अजान के वक्त नहीं कर सकेंगे हनुमान चालीसा का पाठ: उद्धव की पुलिस का फरमान#Maharashtra #HanumanChalisa https://t.co/rfQyu0mvm1
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 18, 2022
कोणत्याही धर्माच्या दैनंदिन कार्यक्रमांना भोंग्यांची आवश्यकता नसल्याने त्यांवर बंदीच पाहिजे ! – महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज
सर्व धर्मियांना त्यांच्या विशेष उत्सवांसाठी ‘समान’ नियमावली सिद्ध करून तेवढ्यापुरतीच भोंगे लावण्याची अनुमती सरकारने द्यायला हवी. विशिष्ट सणांना भोंगे अथवा ध्वनीवर्धक यांची अनुमती घ्यावी; पण प्रतिदिनच्या धार्मिक कारणांसाठी भोंग्यांची अनुमती प्रशासनाने कोणत्याच धर्मातील लोकांना देऊ नये, ही विनंती !
संपादकीय भूमिका
|