पाकचे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रामुळे त्यांच्यावर पाकमध्ये टीका
नवी देहली – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी १७ एप्रिल या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांविषयी पत्र लिहिले होते. ‘दोन्ही देशांनी शांततेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर आणि इतर वादग्रस्त सूत्रे सोडवली पाहिजेत’, असे शरीफ यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. यावर शरीफ यांच्यावर पाकिस्तानमध्ये टीका करण्यात येत आहे. (यावरून पाकिस्तानी नागरिकांना शांतता नको आहे, हेच स्पष्ट होते ! – संपादक)
Pakistan PM Shehbaz Sharif looks for ‘meaningful’ engagement with India, writes to PM Modi https://t.co/25CSd84JYk
— Republic (@republic) April 18, 2022
भारतातील पाकिस्तानच्या दूतावासाचे माजी उपायुक्त अब्दुल बासित यांनी ‘शरीफ यांची प्रतिक्रिया दुर्बल आहे. भारताला अजून सडेतोड उत्तर देता आले असते. काश्मीर हे सूत्र नसून वाद आहे. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात आतंकवादाचे सूत्र उपस्थित केले होते; मात्र भारत समर्थित काश्मीरमधील हिंसाचाराचे काय ? कमांडर कुलभूषण जाधव याचे काय ?’, असे प्रश्न उपस्थित केले.