शस्त्रे पाठवण्यास जितका उशीर कराल, तितक्या अधिक प्रमाणात नागरिक ठार होतील !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची नाटो देशांवर संताप !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की

कीव (युक्रेन) – नाटो देश आम्हाला शस्त्रे पाठवण्यास खूपच उशीर करत आहेत. जितका उशीर करण्यात येईल, तितक्या अधिक संख्येने युक्रेनच्या लोकांचा मृत्यू होईल, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांनी संताप व्यक्त केला आहे. झेलेंस्की यांनी पाश्‍चात्त्य देशांना चेतावणी देतांना म्हटले की, या युद्धाचे भविष्य आता तुमच्यावर अवलंबून आहे.