जगातील सर्वच रस्त्यांवरील नमाजपठणावर बंदी घातली पाहिजे ! – तस्लिमा नसरीन

तस्लिमा नसरीन या खर्‍या पुरोगामी असल्यामुळेच त्या अशी मागणी करू शकतात, तर भारतात बहुतेक पुरो(अधो)गामी हे ढोंगी असून ते मुसलमानांना कुरवाळतात, तर हिंदूंना लाथा झाडतात ! – संपादक

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (उजवीकडे)

नवी देहली – जरी प्रार्थनेसाठी घर ही सर्वोत्तम जागा असल्याचे मी मानते, तरी मुसलमानांनी मशिदींमध्ये नमाजपठण करावे, या त्यांच्या अधिकारांची मी बाजू घेते. असे असले, तरी जेव्हा ते रस्त्यावर नमाजपठण करतात, तेव्हा मी त्यांचा बचाव करत नाही; कारण रस्ते अडवून वाहतूक विस्कळीत होते. जगातील सर्वच रस्त्यांवरील नमाजपठणावर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी ट्वीट करून केली आहे.