‘सनातन प्रभात’मधील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘तेजस्वी विचार’ वाचून मला ‘दैनंदिन जीवनात कसे वागावे ?’ याविषयी मार्गदर्शन मिळते ! – सौ. सरस्वती शंखवाळकर, (गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची मोठी बहीण)
वर्धापनदिनानिमित्त आलेल्या मान्यवरांनी ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन आश्रम’ यांच्याविषयी व्यक्त केलेले भावस्पर्शी विचार !
‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे माझे सर्वांत आवडते दैनिक आहे आणि मी प्रतिदिन ते वाचते. दैनिकाच्या पहिल्या पृष्ठावरील गुरुमाऊलींचे (सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे) ‘तेजस्वी विचार’ हे सदर मी प्रथम वाचते. त्यातून मला ‘दैनंदिन जीवनात कसे वागावे’, याविषयी मार्गदर्शन मिळते. मला पूर्वी पुष्कळ राग यायचा. तो आता न्यून झाला आहे. मी कुणावरीही रागवले, तरी मी आता त्याची लगेच क्षमा मागते. हे आता मला जमू लागले आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनाने मला साधना करायला प्रेरणा मिळते.
मी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जपही प्रतिदिन १ घंटा करण्याचा प्रयत्न करते. यामुळे पुष्कळ चांगले वाटते. आश्रमात येऊन मला सर्वत्र सकारात्मक स्पंदने जाणवली. अशी स्पंदने अन्य कुठेही पहायला मिळत नाहीत. पुष्कळ आनंद झाला. सर्व संसाराचा विसर पडला.’
सौ. शंखवाळकर यांना जाणवले श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सेवेच्या खोलीतील चैतन्य !
सौ. सरस्वती शंखवाळकर यांनी आश्रमदर्शनाच्या बैठकीच्या खोलीत जातांना प्रथम खोलीला नमस्कार केला. त्या वेळी साधकांनी त्यांना विचारले, ‘आपल्याला येथे काय जाणवले ?, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘या खोलीत मला फार वेगळे जाणवते. ‘येथून जाऊया नको’, असे वाटते.’’
ती खोली ही सनातनच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ सेवा करत असलेली खोली होती. त्यांच्या चैतन्याने त्या खोलीतही पुष्कळ चैतन्य निर्माण झाले आहे. सौ. शंखवाळकर यांना याविषयी काहीच ठाऊक नसतांनाही त्यांना त्या खोलीविषयी अनुभूती आली,हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.
– सौ. सरस्वती शंखवाळकर, पणजी (गोव्याचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची मोठी बहीण)