(म्हणे) ‘भाजप ‘नवहिंदुत्ववादी एम्.आय.एम्.’ आणि ‘नवहिंदु ओवैसी’ यांच्या माध्यमातून काम करून घेत आहे !’
शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका
मुंबई – भाजप त्यांचे काम ‘नवहिंदुत्ववादी एम्.आय.एम्.’ आणि ‘नवहिंदु ओवैसी’ यांच्या माध्यमातून करून घेत आहे, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. ‘महाराष्ट्रामध्ये भोंगेवाटप करून मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांनी यासाठी कंत्राट दिले आहे. मग खरे ओवैसी (असदुद्दीन ओवैसी) या प्रकरणामध्ये पडतील आणि याचे रूपांतर दंगलींमध्ये होईल’, अशी भीती राऊत यांनी व्यक्त केली आहे.