पुणे येथे हनुमान जयंतीनिमित्त मुसलमानांच्या हस्ते आरती आणि नमाजपठण !
हिंदूंच्या मंदिरात नमाजपठण करणारे मुसलमान मशिदीमध्ये हिंदूंना भजन, कीर्तन करू देतील का ? – संपादक
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कर्वेनगर येथील हनुमान मंदिरात मुसलमान नागरिकांच्या हस्ते हनुमानाची आरती करण्यात आली, तसेच तेथेच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थितीत इफ्तार देऊन रोजाचा उपवास सोडला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. या वेळी प्रशांत जगताप यांनी हनुमान चालिसा म्हटली, तर मुसलमानांनी नमाजपठण केले.
अजित पवार म्हणाले, ‘‘विविधतेतून एकतेने नटलेल्या भारतभूमीमध्ये सर्व धर्म, प्रांत आणि जातीचे नागरिक गुण्यागोविंदाने रहातात. या धर्म, जात, प्रांत यांचे वेगवेगळे सण असून सर्व नागरिक एकमेकांचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे करतात. (श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर भारतात ठिकठिकाणी धर्मांधांकडून केलेले आक्रमण, नगर येथे आंबेडकर जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांची दगडफेक या घटना ताज्या असतांना अजित पवारांनी असे वक्तव्य करणे संतापजनक नव्हे का ? – संपादक)