सर्व हिंदु बांधवांनी ३ मेपर्यंत सिद्ध व्हावे ! – राज ठाकरे
राज ठाकरे यांच्याकडून मशिदींवरील भोंगे हटवण्याचे आवाहन
५ जूनला अयोध्येला जाण्याची केली घोषणा !
पुणे – भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे. भोंग्यांचा मुसलमानांनाही त्रास होत आहे. तुम्ही जर ५ वेळा भोंगे लावणार असाल, तर आम्हीही दिवसातून ५ वेळा मशिदीसमोर हनुमान चालिसा लावू. देशभरातील सर्व हिंदु बांधवांना माझी विनंती आहे की, ३ मेपर्यंत सिद्ध व्हा ! मुसलमानांना देशाचा कायदा आणि सर्वोच्च न्यायालय यांपेक्षा स्वतःचा धर्म मोठा वाटत असेल, तर त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल आणि हे तितकेच आवश्यक आहे, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्या वेळी त्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या.
राज ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर सभेत ३ मे पर्यंत राज्यातील सर्व मशिदीवरील भोंगे उतरवण्याचं आवाहन केलं आहे.@RajThackeray @mnsadhikrut #lokshahinewshttps://t.co/svPStXnHZS
— Lokshahi News (@news_lokshahi) April 15, 2022
ते पुढे म्हणाले की,
१. १ मे या दिवशी संभाजीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मी जाहीर सभा घेणार आहे.
२. ५ जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकार्यांसह अयोध्येला जाणार आहे.
३. महाराष्ट्रात किंवा देशातही आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली, हाणामारी नको आहेत. मुसलमान धर्मियांनी माणुसकी या नात्याने या गोष्टीचा विचार करावा. प्रार्थनेला विरोध नाही; परंतु त्यासाठी भोंगा लावला जात असेल, तर आमच्याही आरत्या भोंग्यांवरून ऐकवल्या जातील.
४. मशिदींवरील अनधिकृत भोंगे मात्र काढले जात नाहीत; पण आम्ही हनुमान चालिसा लावली, तर ती कृती अनधिकृत कशी होते ? मुसलमान समाजानेही समजून घेतले पाहिजे की, देशापेक्षा धर्म मोठा असू शकत नाही. लोकांना या गोष्टीचा त्रास होतो आहे.
५. आमच्या मिरवणुका निघाल्यानंतर त्यावर दगडफेक होत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. आमचे हात बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही उचलता येतो. समोर असलेले शस्त्र आम्हाला उचलायला लावू नका !
आमचे हात बांधलेले आहेत का ? – राज ठाकरे
पी.एफ्.आय.च्या धमकीला प्रत्युत्तर पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या मुंब्रा येथील पदाधिकार्याने, ‘आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही’, अशी धमकी दिली होती. त्याविषयी राज ठाकरे यांना विचारले असता, ‘आमचे हात काय बांधलेले आहेत का ?’ असा प्रतिप्रश्न करत पी.एफ्.आय.ला थेट प्रत्युत्तर दिले.