पत्नीला गर्भवती करण्यासाठी बंदीवानाला १५ दिवसांची संचित रजा (पॅरोल) संमत
जोधपूर उच्च न्यायालयाचा निर्णय
जोधपूर (राजस्थान) – जोधपूर उच्च न्यायालयाने ऋग्वेदासारख्या हिंदु धर्मग्रंथांसह ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या धर्मांतील सिद्धांतांचा संदर्भ देत जन्मठेपेची शिक्षा भोगणारा ३४ वर्षीय बंदीवान नंदलाल याला त्याची पत्नी रेखा गर्भवती व्हावी, यासाठी १५ दिवसांची संचित रजा (पॅरोल) संमत केली.
जोधपुर हाईकोर्ट ने एक महिला की याचिका पर उसके कैदी पति को 15 दिनों के पैरोल पर इसलिए रिहा करने का आदेश दिया है ताकि कैदी की पत्नी गर्भधारण कर सके. #Jodhpurhttps://t.co/XjlCKkZ8na
— AajTak (@aajtak) April 14, 2022
न्यायालयाने म्हटले की, कारावासामुळे बंदीवानाच्या पत्नीच्या लैंगिक आणि भावनिक गरजांवर परिणाम झाला आहे. १६ संस्कारांपैकी मूल होणे, हा स्त्रीचा पहिला हक्क आहे. वंश जतन करण्याच्या उद्देशाने संतती असणे, धार्मिक तत्त्वज्ञान, भारतीय संस्कृती आणि न्यायालयाच्या विविध निर्णयांद्वारे हे सांगितले गेले आहे. संततीचा अधिकार वैवाहिक सहवासाद्वारे पार पाडला जाऊ शकतो. त्याचाच परिणाम दोषीला सामान्य व्यक्ती बनवण्यावर होतो आणि बंदीवानाचे वर्तन पालटण्यासही साहाय्य होते. पॅरोलचा उद्देश हा आहे की, दोषी कारागृहातून सुटल्यानंतर त्याला शांततेने समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा प्रवेश मिळावा. कोणताही गुन्हा केलेला नसतांनाही आणि ती कोणत्याही शिक्षेखाली नसतांनाही कैद्याच्या पत्नीला तिच्या संततीच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारे, विशेषत: संततीच्या उद्देशाने दोषी बंदीवानाला त्याच्या पत्नीशी वैवाहिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यास त्याच्या पत्नीच्या अधिकारांवर विपरीत परिणाम होईल.