दैनिक ‘सनातन प्रभात’ची चातकाप्रमाणे वाट पहाणारे वाचक !
१. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून मला पुष्कळ आनंद मिळतो. दैनिकाच्या माध्यमातून अनेक संतांचे दर्शन होते आणि त्यांचे मार्गदर्शन मिळते. ‘साधना कशी करावी ?’, हे दैनिकामुळे मला शिकायला मिळाले.
२. दैनिकामुळे मला ‘सण आणि व्रते कशी करावी ?’, हे शिकायला मिळाले. गुढीपाडव्याला गुढी उभारण्याचे शास्त्र कळले. मला ‘लक्ष्मीपूजन, दसरा, दिवाळी आणि गणेशचतुर्थी हे सण शास्त्रानुसार कसे साजरे करायचे ?’, हे दैनिकामुळे समजले.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देश आणि विदेश येथील अनेक मंदिरांना दिलेल्या भेटींविषयीच्या लेखांमुळे घरबसल्या अनेक मंदिरे अन् देवता यांविषयीची माहिती मिळते.
४. दैनिक ‘सनातन प्रभात’ हे आमचे आत्मबळ आहे. ‘उद्या दैनिकात काय वाचायला मिळेल ?’, याची मी चातकाप्रमाणे वाट पहात असते.
यासाठी मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– सौ. शीतल शशिकांत दाभोलकर, नेरुल, पणजी, गोवा. (२०.५.२०२१)