महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांकडे सापडली ९ लाख ७३ सहस्र रुपयांची रोकड !
|
पुणे – सांडपाणी वाहिनीच्या कामाच्या देयकांच्या मान्यतेसाठी ठेकेदाराकडून १५ सहस्र रुपयांची लाच घेतांना साहाय्यक आयुक्तांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्यांच्या घरी घेतलेल्या झडतीमध्ये ९ लाख ७३ सहस्र रुपयांची रोकड आढळून आली. हे पैसे कोठून आले ? याचा तपशील देऊ न शकल्याने पोलिसांनी ही रक्कम शासनाधीन केली. साहाय्यक आयुक्त सचिन तामखडे, कनिष्ठ अभियंता अनंत ठोक आणि शिपाई दत्तात्रय किंडरे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले असून न्यायालयानेही तिघांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.