एटा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्याच्या परिसरात सापडल्या श्री हनुमान आणि शनिदेव यांच्या मूर्ती
देशातील सहस्रावधी मंदिरांना पाडून तेथे मशिदी आणि दर्गे बांधण्यात आल्याचा इतिहास असल्याने अशा मूर्ती या ठिकाणी खोदकाम केल्या तर सापडणारच !
एटा (उत्तरप्रदेश) – येथील जलेसरमधील बडे मियां दर्ग्यापासून १० मीटर अंतरावर पोलीस चौकी बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले असता तेथे श्री हनुमानजी आणि शनिदेव यांच्या मूर्ती सापडल्या आहेत.
यहां खुदा, वहां खुदा
जहां भी खुदा वहा हमारे मंदिर ही निकले।एटा, छोटे मियां बड़े मियां की दरगाह, खोदाई में मिलीं शनिदेव और हनुमान की मूर्तियां, लोग फहराए भगवा झंडेhttps://t.co/rCV0HFb0pj
— अवैध मजार (@illegalMazar) April 15, 2022
सध्या या मूर्ती येथील विश्रामगृहात ठेवण्यात आल्या आहेत. याची माहिती मिळाल्यावर स्थानिक आमदार संजीव दिवाकर येथे पोचले. ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘‘येथे दर्गा नाही, तर मंदिर होते आणि आता या परिसरात मंदिर बांधून तेथे या मूर्तींची स्थापना केली जाईल.’’ स्थानिक लोक पूर्वीपासूनच ‘येथे शनिदेवाचे मंदिर होते’, असा सांगत होते.