अन्य देशांतील नागरिकांचे निवृत्तीवेतन (पेन्शन) न चुकता प्रतिमास ठराविक दिवशी त्यांच्या देशातील बँकेत जमा करण्याची ब्रिटीश शासनाची आदर्शवत् कार्यपद्धत !
‘इंग्लंडमधील आस्थापने तेथे नोकरी करणाऱ्या देशवासियांसह अन्य देशांतील नागरिकांचे निवृत्तीवेतन (पेन्शन) प्रत्येक मासाच्या ठराविक दिवशी न चुकता टपालाने पाठवतात. इंग्लंडच्या शासनाने नागरिकांचे निवृत्तीवेतन वेळेत मिळण्यासाठी घातलेली आदर्श कार्यपद्धत भारताने बोध घेण्यासारखी आहे. यासाठी पुढील उदाहरण पाहूया.
मुंबईतील एक प्रथितयश डॉक्टर इंग्लंडमधील एका आस्थापनात डॉक्टर म्हणून नोकरी करत होते. त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी ही नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांना निवृत्तीवेतन मिळायला लागले. हे आस्थापन प्रत्येक मासाच्या १५ दिनांकाला बँक खात्यात न चुकता निवृत्तीवेतनाची रक्कम जमा करते. तसेच प्रत्येक वर्षी पुढील आर्थिक वर्षी किती निवृत्तीवेतन मिळणार तेही कळवते, तसेच आर्थिक वर्ष संपले की, त्यातून कराची रक्कम (टॅक्स) जमा केली असल्यास कळवते. प्रत्येक वर्षी ‘लाईफ सर्टिफिकेट’ द्यावे लागत नाही. एकदा दिले की पुरे असते. अशा तऱ्हेने इंग्लंडचे शासन आपल्या आणि अन्य देशांतील नागरिकांनी नोकरी केली असल्यास त्यांचे निवृत्तीवेतन वेळेत देते, तसेच त्यासंदर्भातील कागदपत्रे जपून ठेवते. इंग्लंडच्या या कार्यपद्धतीतून भारतानेही बोध घ्यावा.’