भोपाळ येथे मुसलमानबहुल भागातून जाणार्या हनुमान जयंतीच्या मिरवणुकीला पोलिसांनी अनुमती नाकारली !
१६ अटी लादून अन्य ठिकाणी मिरवणूक काढण्यास अनुमती !
|
भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील खेडापती हनुमान मंदिर ते जुने भोपाळ या मार्गामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी मिरवणूक काढण्याची करण्यात आलेली मागणी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी नाकारली. पोलिसांनी म्हटले की, ही मिरवणूक शहरातील अन्य भागातही काढता येऊ शकते; मात्र या भागात अनुमती देता येणार नाही.’ यानंतर अन्य मार्गावरून ही मिरवणूक काढण्याचे ठरले; मात्र त्या वेळीही प्रशासनाने १६ अटी घालत त्याला अनुमती दिली. काही मौलवींनी ‘या भागातून धार्मिक मिरवणूक काढणे धोकादायक ठरू शकते’, असे सांगितल्याने प्रशासनाकडून हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Madhya Pradesh: After Muslim clerics object, Police cancel permission for Hanuman Jayanti procession in old city of Bhopal https://t.co/94PTC24HgQ
— OpIndia.com (@OpIndia_com) April 16, 2022
या राज्यातील खरगोन येथे श्रीरामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारानंतर प्रशासनाने हनुमान जयंतीच्या वेळी मिरवणुका काढतांना १६ अटी ठेवल्या. यामध्ये मिरवणुकांमध्ये कोणत्याही आक्षेपार्ह घोषणा देण्यात येऊ नये, आक्षेपार्ह भित्तीपत्रके लावण्यात येऊ नयेत, ‘डिजे’वर (मोठ्या संगीत यंत्रणेवर) कोणती गाणी वाजवण्यात येणार ?, याची सूची देणे, त्रिशुळ आणि गदा यांच्या व्यतिरिक्त कोणतेही अन्य शस्त्र वापरू नये, विडी, सिगरेट आदी अमली पदार्थांचा वापर करण्यात येऊ नये; मिरवणुकांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याला आयोजक उत्तरदायी असतील, असे म्हटले होते.