बळजोरीने वर्गणी मागितल्‍याच्या प्रकरणी सोलापूर येथील तिघांवर गुन्‍हा नोंद !

सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्‍या निमित्ताने बळजोरी करून २१ सहस्र रुपयांची वर्गणी मागितल्‍याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्‍था, डॉ. आंबेडकर जयंती उत्‍सव मंडळ, बुधवार पेठ या मंडळाचे चिंटू कांबळे आणि त्‍यांचे २ सहकारी यांच्‍यावर जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. राजूराम खोत यांनी याविषयी तक्रार दिली होती. राजूराम खोत यांना चिंटू कांबळे यांनी २१ सहस्र रुपये वर्गणीचे पैसे द्या. वर्गणी न दिल्‍यास तुमचे दुकान चालू देणार नाही. तुम्‍ही कसे काम करता ते पहातो, अशी धमकी देऊन निघून गेल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.