परभणी येथे गावगुंडांच्या सतत होणाऱ्या त्रासामुळे पती-पत्नी यांनी घेतला गळफास !
पतीचा मृत्यू, तर पत्नीची मृत्यूशी झुंज !
पोलिसांनी गुंडांच्या विरोधात कारवाई केली का केली नाही ? पती-पत्नी यांनी एवढे टोकाचे पाऊल उचलेपर्यंत पोलीस निष्क्रीय का राहिले ?, याचीही चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
परभणी – जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील एका गावातील ५ गावगुंडांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पती-पत्नी यांनी गळफास घेतला. यात पतीचा मृत्यू झाला, तर दोरी तुटल्याने पत्नी बचावली आहे. सामान्य रुग्णालयात पत्नीवर उपचार चालू असून तिची मृत्यूशी झुंज चालू आहे. १४ एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली.
परभणी येथील सेलू गावात पती- पत्नीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट #Police #Crime #village #Parbhani #Selu #commit #SaamTvNewshttps://t.co/JWdf6FAW4Q
— SaamTV News (@saamTVnews) March 28, 2022
पतीने ‘व्हॉट्सॲप स्टेटस’मध्ये म्हटले होते की, गावातील ५ गावगुंडांकडून आम्हाला दोघांना सतत जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. पत्नीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ‘ब्लॅकमेल’ केले जात असल्याने आम्ही हे टोकाचे पाऊल उचलत आहोत.
याविषयी पहाटे काही ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या भावाला उठवले आणि घरात प्रवेश केला असता; पण तोपर्यंत त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.