एटा (उत्तरप्रदेश) येथे हिंदू अर्पण करत असलेल्या दर्ग्यामध्ये तब्बल ९९ कोटी रुपयांचा अपहार !
-
शनिमंदिराच्या जागेवर अतिक्रमण करून उभारला दर्गा !
-
सरकारी अधिकार्यांना अतिक्रमणाच्या संदर्भात ठाऊक असूनही कोणतीच कारवाई नाही !
-
दर्ग्याच्या व्यवस्थापनात हेराफेरी करणारा अकबर अन् अन्य आरोपी पसार !
|
एटा (उत्तरप्रदेश) – जिल्ह्यातील जलेसरमध्ये ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’नावाच्या दर्ग्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे दर्ग्याचे व्यवस्थापन सरकारी अधिकार्यांनी स्वत:च्या हाती घेतले आहे. अपहार करणारा अकबर अन् अन्य धर्मांध पसार आहेत. यासंदर्भात जवळपास ९९ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.
या प्रकरणाच्या मुळाशी गेल्यावर लक्षात आले की, दर्ग्याच्या ठिकाणी आधी शनिदेवाचे मंदिर होते; परंतु धर्मांधांनी अतिक्रमण करून तेथे दर्गा बांधला. हे स्थानिक हिंदूंनाही ठाऊक आहे. असे असले, तरी हिंदू तेथे शनिमंदिर असल्याचा भाव ठेवून पूजाअर्चा करतात आणि मोठ्या प्रमाणात पैसेही अर्पण करतात. (दर्ग्याच्या ठिकाणी मंदिर होते आणि त्याविषयी हिंदूंच्या मनात भाव आहे, हे चांगलेच आहे; मात्र मंदिरावर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी वैध मार्गाने प्रयत्न करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्य आहे. ते केल्यास देवाला अधिक आवडेल ! – संपादक)
बड़े मियां-छोटे मियां दरगाह समिति के सदस्यों पर धोखाधड़ी का मुकदमा दर्ज #अपराध #उत्तर प्रदेश #देश #प्रदेश #राजनीति #विविध #हलचलhttps://t.co/Ci2nhzCyID
— Samachar Today™ (@samachartodaytv) April 13, 2022
१. अतिक्रमण झाल्याचे सरकारी अधिकारीही मान्य करतात; परंतु त्याविरोधात कुणीच काही कारवाई करत नाही.
२. अलीगंजचे उपविभागीय दंडाधिकारी अलंकार अग्निहोत्री यांनी सांगितले की, हिंदू दर्ग्याच्या ठिकाणी जाऊन तेथे भगवा ध्वज लावतात, तसेच तेथे पूजाअर्चा करतात.
३. ‘दर्गा बांधण्यासाठी जमा झालेल्या धर्मांधांनी हळूहळू पूर्ण मंदिरावर अतिक्रमण केले. त्यामुळे मंदिराचे अस्तित्वच नष्ट झाले’, असे ग्रामपंचायतीचे प्रधान शैलेंद्र सिंह यांनी सांगितले.
४. स्थानिक आमदार संजीव दिवाकर यांचेही असेच म्हणणे आहे.