समर्थ रामदासस्वामींबरोबर मारुति जेवायला बसणे; पण देवाचे दैवीपण सहन करण्याची क्षमता नसल्याने मारुतीचे ते तेजस्वी रूप पाहून शिष्या वेण्णाबाई बेशुद्ध पडणे

समर्थ रामदासस्वामींच्या शिष्या संत वेण्णाबाई

‘एक दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘देव समोर आला, तरी त्याला बघता यायला हवे ना !’’ मी म्हटले, ‘‘देवाचे दैवीपण आपल्याला सहन होत नाही.’’ सामान्य व्यक्तीपेक्षा देव सहस्रो पटींनी तेजःपुंज असतो. त्यामुळे त्याला सामान्य डोळ्यांनी बघणे अशक्यच आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगण्यापूर्वी स्वतःचे ‘विश्वदर्शनरूप’ दाखवले. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला दिव्यदृष्टी दिली होती. तेव्हा तो ते रूप बघू शकला.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

समर्थ रामदासस्वामी सज्जनगडावर असतांना त्यांच्या कुटीमध्ये त्यांच्या शिष्या वेण्णाबाई त्यांना जेवणाचे ताट आणून द्यायच्या. त्या वेळी रामदासस्वामींनी वेण्णाबाईंना सांगितले होते, ‘ताट कुटीमध्ये ठेवले की, कुटीचे दार लावायचे आणि निघून जायचे. मागे वळून बघायचे नाही आणि मी जेवत असतांना मला बघायचे नाही.’ वेण्णाबाई आज्ञापालन करायच्या; पण एक दिवस त्यांच्या मनाला उत्सुकता लागली की, रामदासस्वामींनी असे का सांगितले असावे ? त्यामुळे वेण्णाबाईंनी कुटीमध्ये जेवणाचे ताट आणून ठेवल्यावर थोड्या वेळाने दाराच्या फटीतून पाहिले, तर रामदासस्वामींबरोबर मारुति जेवायला बसला होता. मारुतीचे ते तेजस्वी रूप पाहून त्या बेशुद्ध पडल्या.

यावरून लक्षात येते, ‘पूर्वीच्या संतांचा अधिकार केवढा मोठा होता. त्यांच्यासमोर साक्षात् देव यायचा आणि ते देवाला बघू शकायचे. आपला हिंदु धर्म किती महान आहे. अन्य धर्मांत असे काही आहे का ?’

– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.४.२०२२)