पुणे येथील हनुमान मंदिरात ‘इफ्तार’चे आयोजन !
राष्ट्रवादी काँग्रेस करणार आणखी एक हिंदुद्रोही निर्णय !
|
पुणे – येथील साखळीपीर तालीम येथील राष्ट्रीय मारुति मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून इफ्तारचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या इफ्तारचे आयोजन केले असून ज्येष्ठ साहित्यिक अन् अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस या कार्यक्रमाला उपस्थित होते.
नास्तिक @PawarSpeaks यांच्या पक्षाकडून पुण्यातील साखळीपीर हनुमान मंदिरात इफ्तार पार्टी ठेवणार आहेत. ही कोणत्या प्रकारची नास्तिकता आहे? हा सरळ हिंदू धर्माच्या श्रध्देवर घाला आहे. @NCPspeaks जाहीर निषेध! समस्त हिंदूंनी याचा निषेध करावा! @jagdishmulikbjp @mohol_murlidhar pic.twitter.com/jNITwxhEn8
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 15, 2022
रवींद्र माळवदकर यांनी सांगितले, ‘आम्ही हा उपक्रम यावर्षी आयोजित केला, असे नाही. हा उपक्रम मागील ३५ वर्षांपासून आयोजित करत असून यामध्ये समाजातील प्रत्येक घटक सहभागी होत असतो. इथे येऊन नतमस्तक होतो. यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते.’