आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त नामजपांचे ध्वनिमुद्रण सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या मंगलहस्ते लोकार्पण !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ नामजप सिद्ध !
रामनाथी (गोवा) – आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ या नामजपांच्या ध्वनिमुद्रणाचे लोकार्पण डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे सुप्रसिद्ध गायक पू. किरण फाटक यांच्या मंगलहस्ते १५ एप्रिल या दिवशी येथे आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या संगीत समन्वयक संगीत विशारद कु. तेजल पात्रीकर यांनी विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार हे नामजप ध्वनीमुद्रित केले असून ते सनातनचे संकेतस्थळ अन् ‘सनातन चैतन्यवाणी’ अॅप यांवर मराठी, हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या भाषांमध्ये सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.
कार्यक्रमाच्या आरंभी या नामजपांविषयी थोडक्यात माहिती सांगण्यात आली. त्यानंतर पू. फाटक यांनी ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ हे नामजप अनुक्रमे उपस्थितांना ऐकवून या नामजपांचे लोकार्पण केले. या कार्यक्रमाला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली.
⏬ आजच डाउनलोड करा ‘सनातन चैतन्यवाणी एप’ : http://Sanatan.org/Chaitanyavani
‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ हे नामजप म्हणण्याची योग्य पद्धत ! याविषयीचे लिखाण वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/571146.html
नामजप लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि अन्य साधक यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण लवकरच प्रसिद्ध करत आहोत.