(म्हणे) ‘गुरुग्राम (हरियाणा) येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर खलिस्तानचा झेंडा फडकावणार !’
बंदी घालण्यात आलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेची घोषणा
खलिस्तानी आतंकवाद्यांच्या मुसक्या आवळल्या नाहीत, तर ते उद्दाम होऊन त्यांच्या समाजविघातक कारवायांमध्ये वाढ होईल. त्यामुळे खलिस्तानवादी आतंकवाद संपवणे आवश्यक ! – संपादक
नवी देहली – बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने ‘हरियाणा बनणार खालिस्तान’ या नावाने पत्र प्रसारित केले आहे. यात ‘गुरुग्रामच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ एप्रिल या दिवशी खलिस्तानी झेंडा फडकावण्यात येईल’, असे म्हटले आहे.
या संघटनेचा प्रमुख गुरपतवंतसिंह पन्नू याने या पत्रात म्हटले आहे, ‘हरियाणा राज्यावर पंजाबचा अधिकार आहे. यासाठी या जिल्हाधिकारी कार्यालयावर खलिस्तानचा झेंडा फडकावण्यात येईल.’ या संघटनेने यापूर्वी खलिस्तानचे मानचित्र (नकाशा) प्रसिद्ध केला आहे. त्यात हरियाणा राज्यही अंतर्भूत आहे.