अलीगडमध्ये मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून ऐकवली जात आहे हनुमान चालिसा !
अलीगड (उत्तरप्रदेश) – अलीगडमध्ये युवा क्रांती मंचच्या कार्यकर्त्यांनी गांधी पार्कमध्ये ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसाचे पठण केले. ‘आम्ही याआधीही प्रशासनाला मशिदींवरील ध्वनीक्षेपक काढण्यासाठी पत्र दिले होते; पण त्यावर कोणताच निर्णय झाला नाही. यामुळेच आम्ही हनुमान चालिसा पठण केले’, असे या मंचाकडून सांगण्यात आले आहे.
अलीगढ़ में ABVP की ओर से 21 चौराहों पर लाउडस्पीकर लगाकर हनुमान चालीसा पढ़ने की अनुमति मांगी गई है. #Aligarh #ABVP #HanumanChalisa #Loudspeakershttps://t.co/bG2YzZZcRV
— ABP News (@ABPNews) April 15, 2022
१. युवा क्रांती मंचचे शिवांग तिवारी यांनी सांगितले की, प्रत्येक चौकात ध्वनीक्षेपक लावून हनुमान चालिसा ऐकवली जाणार आहे. पहाटे ५ आणि सायंकाळी ५ वाजता ती ऐकवली जाणार आहे. याच वेळी मशिदींवरील भोंग्यांवरून अजान ऐकवली जाते. त्याचवेळी आमचे हनुमान चालिसा पठण चालू होईल. आम्ही हनुमान चालिसा पठण आणि आरती करणार आहोत.
२. अलीगडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) वतीने चौकात ध्वनीक्षेपक लावून हनुमान चालिसा पठण करण्यासाठी प्रशासनाकडे अनुमती मागण्यात आली आहे. अभाविपचे बलदेव चौधरी यांनी ‘जर प्रशासनाने अनुमती दिली नाही आणि काही योग्य कारण दिले नाही, तर आम्ही १९ एप्रिलला अनुमतीविना ध्वनीक्षेपक लावून हनुमान चालिसा म्हणणार आहोत’, अशी चेतावणी दिली आहे.