रशिया युक्रेनवर अणूबाँब टाकण्याची शक्यता !

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखाचा दावा !

मॉस्को (रशिया) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला ५० हून अधिक दिवस उलटले, तरी रशियाला युक्रेनवर विजय मिळवता आलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर रशिया युक्रेनवर अणूबाँब टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सीआयएचे प्रमुख विल्यम बर्न्स यांनी ही शक्यता वर्तवली आहे. ते म्हणाले की, रशियाच्या सैन्याला अनेक ठिकाणी जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना निराश आली आहे. यामुळेच रशियाकडून अणूबाँबचा वापर केला जाऊ शकतो.