धर्म वाचवण्यासाठी जातीपातीची सर्व बंधने झुगारून संघटित झाले पाहिजे ! – सद्गुरु महर्षि ॐ
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीने सोनीपत (हरियाणा) येथे घेतलेल्या हिंदु राष्ट्र अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
सोनीपत (हरियाणा ) – आज एका सुनियोजित पद्धतीने हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी गुरु गोविंदसिंह यांची मुले आणि शिखांचे १० गुरु यांनी बलीदान दिले; पण जिहादी धर्म स्वीकारण्यास नकार दिला. हे लक्षात घेऊन हिंदु धर्म वाचवण्यासाठी सर्वांनी जातीपातीची सर्व बंधने झुगारून ‘हिंदु’ म्हणून संघटित होणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु महर्षि ॐ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ३ एप्रिल या दिवशी हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते मार्गदर्शन करत होते.
या अधिवेशनाला हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांची वंदनीय उपस्थिती होती. या अधिवेशनाला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार केला.
अधिवेशनाला उपस्थित मान्यवर
श्रीराम सेनेचे श्री. सुरेश चावला, विश्व हिंदु परिषदेचे अधिवक्ता मोहन कौशिक आणि अधिवक्ता संतराम सिंह, गोरक्षक तथा नवदुर्गा मंदिराचे विश्वस्त श्याम सुंदरजी, हिंदु जनजागृती समितीचे नरेंद्र सुर्वे, धर्मप्रेमी पंडित श्याम सुंदर शर्मा, सर्वश्री रामकंवर मलिक आणि पानिपत येथील देवेंद्र सिंग
हिंदु राष्ट्र अधिवेशनाचा यज्ञ हिंदुत्वनिष्ठांच्या विचारांनी धगधगत आहे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु राष्ट्र अधिवेशन हा एक यज्ञ असून तो हिंदुत्वनिष्ठांच्या विचारांनी धगधगत आहे. आज स्वार्थी आणि अहंकारी राजकीय नेते सत्ताप्राप्तीसाठी एकत्र येतात, तर मग नि:स्वार्थ भावाने हिंदुत्वाचे कार्य करणारे हिंदू संघटित झाल्यास आपण निश्चितपणे हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतो. सध्या ‘हिंदु आणि हिंदुत्व हे दोन्ही वेगवेगळे आहे’, असा अपप्रचार करून हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न चालू आहे.
सद्गुरु महर्षि ॐ यांचा संक्षिप्त परिचय :सद्गुरु महर्षि ॐ गन्नौर (हरियाणा) चे मूळ निवासी असून सध्या ते फ्लोरिडा (अमेरिका) येथे वास्तव्याला आहेत. तेथे ते लोकांमध्ये सनातन धर्माचा प्रसार करतात. |
सोनीपतमध्ये हिंदूंचा नायनाट थांबवण्यासाठी जागे व्हा ! – अधिवक्ता मोहन कौशिक, विश्व हिंदु परिषद
आज इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि काश्मीर येथे जशी हिंदूंची स्थिती आहे, तशीच स्थिती हरियाणा राज्यात मेवात येथे झाली आहे. सध्या मेवातच्या ५३४ पैकी २०० गावांमध्ये एकही हिंदु शेष नाही. तीच स्थिती सोनीपतमध्येही निर्माण होत आहे. हिंदूंचा हा नायनाट टाळण्यासाठी आपल्याला जागे झाले पाहिजे.
हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता आहे ! – रामकंवर मलिक
आज आपले राष्ट्र आणि सनातन धर्म यांची स्थिती मृतप्राय झाली आहे. हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणात उदासीनता निर्माण झाली आहे. अशा समाजाला संघटित करून जागृत करण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येकाने आठवड्यातून एकदा तरी मंदिरात जावे ! – देवेंद्र सिंग, पाथरी, पानिपत
सनातन धर्मामध्ये मंदिरांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी आठवड्यातून एकदा तरी निश्चितपणे आपल्या जवळच्या मंदिरात गेले पाहिजे. तसेच तेथील स्वच्छता आणि सेवा केली पाहिजे. सर्व मंदिरांनी प्रत्येक मासात पौर्णिमेला हवन केल्याने वातावरणाची शुद्धी होईल.
फाळणीनंतर धर्मांधांना भारतात राहू देणे, ही मोठी चूक ! – श्याम सुंदरजी, गोरक्षक तथा विश्वस्त, नवदुर्गा मंदिर
धर्माच्या आधारावर भारताची फाळणी झाली आणि ज्या धर्मांधांनी वेगळ्या राष्ट्राची मागणी केली, त्यांनाच भारतात रहाण्याची अनुमती दिली. त्यामुळेच आज विविध समस्या निर्माण झाल्या आहेत, ज्या आपण सर्व अनुभवत आहोत.
हिंदूंच्या एकजुटीमुळे हनुमान मंदिर वाचवता आले ! – अधिवक्ता संतराम सिंह, विश्व हिंदु परिषद
सोनीपतमध्ये एका पुलाचे बांधकाम करतांना ‘हायवे ॲथॉरिटी’ने एक प्राचीन हनुमान मंदिर तोडण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही पुष्कळ प्रयत्न करूनही ते ऐकण्यास सिद्ध नव्हते. सर्व कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न आणि हिंदूंची एकजूट यांमुळे आम्हाला ते मंदिर वाचवता आले.
हिंदु व्यापाऱ्यांनी हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार टाकावा ! – नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती
भारतात मोठ्या प्रमाणात हलाल प्रमाणपत्र विकण्यात येत आहे. या जमलेल्या पैशातून ‘जमियत उलेमा ए हिंद हलाल ट्रस्ट’ आतंकवाद्यांना साहाय्य करत आहे. हे हिंदूंसाठी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे हिंदु व्यापाऱ्यांनी हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची आवश्यकता आहे.