उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शिक्षण विभागाकडून वीजदेयकांच्या थकित रकमेचा भरणा !

वीज तोडेपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळांची देयके का भरण्यात आली नाहीत ? – संपादक

उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – वीजदेयकांची रक्कम वेळेत न भरल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या सहस्रावधी शाळांची वीजजोडणी तोडण्यात आली आहे. याविषयी १३ एप्रिल या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची बैठक झाली. या वेळी उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यातील १४ सहस्र १४८ शाळांच्या थकित वीजदेयकांची रक्कम भरण्यासाठी १४ कोटी १८ लाख रुपये शिक्षण विभागाकडून महावितरणाला देण्यात आले. थकीत रकमेचे पैसे महावितरणला देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणंमत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.

मागील आठवड्यात दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांतील वीजदेयकांची थकित रक्कम भरण्याविषयी सरकार आणि प्रशासन यांच्यातील भोंगळ कारगाराविषयीचे ठळक वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.