अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या कह्यात !
मुंबई – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणात त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना सातारा पोलिसांनी कह्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील आक्रमणाच्या प्रकरणी अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
सदावर्ते यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मराठा आरक्षणाच्या सूत्रावर बोलतांना खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी वारंवार चौकशीला बोलावूनही ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे सातारा पोलिसांनी गिरगाव न्यायालयात ‘सदावर्ते हे चौकशीसाठी कह्यात मिळावेत’, अशी मागणी केली होती.