मुंबई विमानतळावर २४ कोटी रुपयांचे हेरॉईन कह्यात !

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने कह्यात घेतलेले हेरॉइन

मुंबई – केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एन्.सी.बी.) मुंबई विमानतळावर एका परदेशी व्यक्तीकडून ३ किलो ९८ ग्रॅम अमली पदार्थ (हेरॉइन) कह्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजरपेठेमध्ये या हेरॉइनचे मूल्य २४ कोटी रुपये इतके आहे. १२ एप्रिल या दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे.

पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी या व्यक्तीला विमानतळावरून कह्यात घेऊन तिच्या सामानाची पडताळणी केली. यात ट्रॉली बॅगमध्ये अमली पदार्थांच्या एकूण चार पिशव्या सापडल्या आहेत. मागील वर्षी दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या एका महिलेला अटक केली होती. तिच्याकडे ३.९ किलो हेरॉईन सापडले होते, असे पथकाने म्हटले आहे.