नागपूर येथून ‘एस्.टी.’चे कर्मचारी संदीप गोडबोले यांना अटक !
सिल्व्हर ओक आक्रमण प्रकरण१६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ! |
नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईस्थित ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी एस्.टी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आक्रमणाचे धागेदोरे नागपूरपर्यंत पोचले आहेत. १३ एप्रिल या दिवशी बडतर्फ एस्.टी कर्मचारी संदीप गोडबोले यांना येथून मुंबई पोलिसांनी अटक केली. गणेशपेठ आगारात यांत्रिक विभागात कार्यरत असलेले गोडबोले यांना बडतर्फ करण्यात आले होते. मुंबई येथील न्यायालयात गोडबोले यांना उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील एक पत्रकार कह्यात !
पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी करण्यात आलेल्या आक्रमणाच्या प्रकरणी पुण्यातील ‘एम्.जे. मराठी न्यूज’चे यू ट्यूब चॅनल चालवणारे पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी यांना मुंबई पोलिसांनी कह्यात घेतले आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत ११५ जणांना कह्यात घेतले असून त्यांपैकी १०९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.