हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या विरोधानंतरही बेलूरू (कर्नाटक) येथील मंदिराच्या रथोत्सवाचा कुराण पठणाने प्रारंभ !
राज्याच्या धर्मदाय विभागाचा पुढाकार !
|
बेलूरू (कर्नाटक) – येथील प्रसिद्ध श्रीचेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने विरोध केला होता. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्याच्या धर्मदाय विभागाने प्रयत्न केला. या वेळी येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हा उत्सव २ दिवस चालतो.
Karnataka govt permits Quran recitation at Channakeshava temple fair despite opposition#Karnataka https://t.co/hXdRrpVhD1
— TIMES NOW (@TimesNow) April 14, 2022
१. हिंदुत्वनिष्ठांनी प्रशासनाकडे आणि मंदिर व्यवस्थापनाकडे श्रीचेन्नकेशव मंदिराच्या रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठाणाने करण्याची परंपरा बंद करण्याची मागणी केली होती.
२. श्रीचेन्नकेशव मंदिर व्यवस्थापनाने मंदिर उत्सवात मुसलमान व्यावसायिकांना दुकाने न लावण्यास सांगितल्याने गोंधळही निर्माण झाला होता; मात्र धर्मादाय विभागाने वेगवेगळ्या पुजार्यांशी चर्चा करून मंदिर व्यवस्थापनाला अहिंदू व्यावसायिकांनाही उत्सवात सहभागी होऊ देण्याचे निर्देश दिले. (मुसलमानधार्जिणा धर्मादाय विभाग ! हिंदूंच्या हितापेक्षा अहिंदूंच्या हिताचा विचार करणारा धर्मादाय विभाग विसर्जित करा ! – संपादक) आता १५ मुसलमान दुकानदारांनी त्यांची दुकाने येथे थाटली आहेत.