कुतूबमीनार परिसरातील हिंदूंच्या मूर्ती हटवण्यावर न्यायालयाची बंदी

नवी देहली – येथील साकेत न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागाला कुतूबमीनार परिसरातील कुव्वत-उल्-इस्लाम मशिदीमधील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती हटवण्यास बंदी घातली आहे. मोगलांच्या काळात येथील मंदिरे पाडून मूर्ती उघड्यावर ठेवण्यात आल्या.

या मूर्तींची पुन्हा स्थापना करून पूजा करण्याची मागणी करणारी याचिका अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांच्याकडून न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. यापूर्वी येथील दिवाणी न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेली याचिका फेटाळून लावण्यात आली होती.