तलवार घेऊन हिंदूंच्या दिशेने पळत जाणार्या तरुणाला रोखले असता, अन्य एकाने माझ्यावर गोळीबार केला ! – घायाळ पोलीस अधीक्षक
मध्यप्रदेशच्या खरगोनमध्ये श्रीरामनवमीच्या शोभायात्रेवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाचे प्रकरण
|
खरगोन (मध्यप्रदेश) – धर्मांधांनी रामनवमीच्या दिवशी हिंदूंनी काढलेल्या शोभायात्रेवर आक्रमण केले होते. हिंदूंनी त्यास प्रत्युत्तर दिले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या सर्व झटापटीत तेथे उपस्थित पोलीस अधीक्षक सिद्धार्थ चौधरी घायाळ झाले. त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देतांना ते म्हणाले, ‘‘दंगलीच्या वेळी एक तरुण हातात तलवार घेऊन हिंदूंच्या दिशेने पळत असल्याचे मी पाहिले. त्याला रोखण्याचा प्रयत्न करून त्याच्याकडून तलवार हिसकावून घेतांना माझ्या हाताला इजा झाली. अशातच त्याला साहाय्य करण्यासाठी आलेल्या अन्य एकाने माझ्यावर गोळीबार केला. गोळी माझ्या पायाला लागली.’’
‘A sword-wielding miscreant dashed toward the Hindus’: SP who sustained bullet injury narrates the mayhem unleashed during Khargone violencehttps://t.co/bRvqM8BA6N
— OpIndia.com (@OpIndia_com) April 12, 2022
रामनवमीला शहरातील तालाब चौक, शीतलामाता मंदिर आणि सराफ बाजार या परिसरात दंगलीच्या घटना झाल्या होत्या. यावेळी काही घरांना आगही लावण्यात आली. आक्रमणकारी धर्मांधांनी अतिक्रमण करत घरे बांधली असल्याने प्रशासनाने त्यांच्या घरावर बुलडोझर फिरवून ती पाडली.