असो तुमच्यासम गुरुचरणांचा ध्यास । हाच आशिष द्या पू. होनपकाका आज आम्हास ।।

सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप यांचा आज १४.४.२०२२ या दिवशी ‘ऐंद्री शांतीविधी सोहळा’ आहे. त्या निमित्ताने …

चैत्र शुक्ल त्रयोदशी (१४.४.२०२२) या दिवशी सनातनचे ७ वे संत पू. पद्माकर होनप (वय ७४ वर्षे) यांचा ‘ऐंद्री शांतीविधी सोहळा’ (टीप) आहे. त्यानिमित्त साधक श्री. अजित तावडे यांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले काव्यरूपी कृतज्ञतापुष्प पुढे दिले आहे.

टीप – वयोवृद्ध झाल्यावर मनुष्याची इंद्रिये क्षीण होत जातात. ‘त्यांना पुष्टी मिळावी’, यासाठी व्यक्तीने ७५ व्या वर्षात पदार्पण केल्यावर ‘ऐंद्री शांतीविधी’ करतात.

पू. पद्माकर होनप

पू. पद्माकर होनप यांच्या चरणी ‘ऐंद्री शांतीविधी सोहळ्या’निमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

श्री. अजित तावडे

लेखाची सेवा करूनी जमाखर्च पडताळूनी ।
जीवनाचा जमाखर्च गुरुचरणी अर्पण करूनी ।। १ ।।

शरणागतभाव नित्य अंतरी ठेवूनी ।
सदा लीन असती गुरुचरणी ।। २ ।।

प्रेमाने सर्वांना अपुले करती ।
आध्यात्मिक त्रास साधकांचे दूर करण्या ।
साऱ्यांना नामजपाने चैतन्य देती ।। ३ ।।

विनम्रता नित्य असे त्यांच्या ठायी ।
वात्सल्य त्यांच्या हृदयी, साऱ्यांना सारखेच प्रेम देती ।। ४ ।।

झाले कितीही शारीरिक कष्ट स्वतःला ।
तरीही आनंद अंतरीचा कमी न होई ।। ५ ।।

भाग्य आमचे थोर श्री गुरूंनी दिले ।
असे पित्यासम संत आम्हा ।। ६ ।।

मागणे हेची श्री गुरुचरणी आज ।
यावी त्यांच्यासम लीनता आमच्यात ।। ७ ।।

असो तुमच्यासम गुरुचरणांचा ध्यास ।
हाच आशिष द्या पू. काका आज आम्हास ।। ८ ।।

– श्री. अजित तावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक