तलवार दाखवल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा नोंद करा ! – अविनाश जाधव, अध्यक्ष ठाणे आणि पालघर मनसे
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा नोंद होत असेल, तर असाच गुन्हा मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलावरही नोंद करावा, अशी मागणी मनसेचे ठाणे आणि पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.
उद्धवा अजब तुझे सरकार!! pic.twitter.com/OPeg27pNNW
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 13, 2022
ते पुढे म्हणाले की, सरकारच्या पायाखालची भूमी सरकली आहे. राज ठाकरे यांना कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यात अडकवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात अनेक नेत्यांनी व्यासपिठांवर, तसेच सभेमध्ये तलवारी दाखवल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही विरोधात गुन्हा नोंद झाला नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, अशी चेतावणी जाधव यांनी दिली आहे.