रशिया-चीन यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ !
|
मॉस्को (रशिया) – युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारल्यानंतर जिथे अमेरिका आणि युरोपीय देश यांनी रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादले, तिथे आर्थिक दृष्टीकोनातून रशिया अन् चीन जवळ आले आहेत. उभय देशांमधील व्यापार पाहिला, तर गेल्या तिमाहीत यामध्ये तब्बल ३० टक्क्यांची वाढ झाली आहे, असे रशियाची सरकारी वृत्तवाहिनी ‘रशिया टुडे’ने म्हटले आहे. यामुळे आर्थिक जग विभागले जात असल्याचे आणि त्यातून नवीन समीकरणे सिद्ध होत असल्याचे दिसून येत आहे.