धार्मिक तेढ पसरवल्याचे प्रकरणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांच्या विरोधात गुन्हा नोंद
भोपाळ – काँग्रेसचे नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या विरोधात गुन्हे शाखेने धार्मिक तेढ पसरवल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवला. मध्यप्रदेशच्या खरगोन आणि बरवानी जिल्ह्यांत रामनवमीच्या शोभायात्रांवर दगडफेक करण्यात आली.
Digvijay Singh had tweeted a photo of a man putting up saffron flags on the minarets of a mosque as a group appeared to cheer him on with sticks and swords. But the picture was from Bihar and not from Madhya Pradesh’s #khargone#AntiHinduCongress pic.twitter.com/ghzTDNNPci
— Krishnapreeti (@Krishnavallabhi) April 13, 2022
खरगोनमध्ये वाढत्या तणावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांनी एक छायाचित्र ट्विट केले, ज्यामध्ये एक तरुण धार्मिक स्थळावर भगवा ध्वज फडकावतांना दिसत आहे. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिग्विजय सिंह धार्मिक उन्माद भडकावण्याचा प्रयत्न करत असल्याचे ट्विट केले.
श्री @digvijaya_28 ने एक धार्मिक स्थल पर युवक द्वारा भगवा झंडा फहराने का फोटो सहित ट्वीट किया है, वह मध्यप्रदेश का नहीं है।श्री दिग्विजय सिंह का यह ट्वीट प्रदेश में धार्मिक उन्माद फैलाने का षड्यंत्र है और प्रदेश को दंगे की आग में झोंकने की साजिश है, जिसे बर्दाश्त नहीं किया जाएगा।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) April 12, 2022
दिग्विजय सिंह यांनी वापरलेले छायाचित्र मध्यप्रदेशातील नसल्याचे त्यांनी म्हटले होते. यानंतर दिग्विजय सिंह यांनी त्यांचे ट्विट हटवले. या प्रकरणाविषयी भाजपच्या कार्यकर्त्यांनी भोपाळ येथील गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोर निदर्शने केली.