विज्ञानवादी मनुष्याला संतांचे संतत्व पटवून देण्यासाठी वैज्ञानिक उपकरणांचेच साहाय्य !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बोधप्रद मार्गदर्शन
‘मनुष्याची श्रद्धा न्यून होऊन तो बुद्धीवादी होऊ लागला आहे. त्यामुळे त्याची सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता अल्प झाली आहे, त्याचबरोबर त्याचा मन आणि बुद्धी यांच्यापलीकडील अध्यात्मावर विश्वासही राहिलेला नाही. त्याचा विश्वास केवळ विज्ञानावर आहे. त्यामुळे एखाद्याने साधना करून तो ‘संत’पदावर पोचला, तरी इतर ‘तो संत आहे, याचे प्रमाण काय ?’, असे विचारतात. त्यामुळे ‘तो संत आहे’, हे आता ‘सनातन संस्था’ आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ हे ‘इलेक्ट्रोसोमॅटोग्राफिक स्कॅनिंग’, ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’, ‘पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी (पिप)’, ‘थर्मल इमेजिंग’, ‘गॅस डिस्चार्ज व्हिजुअलायझेशन (जी.डी.व्ही.)’ इत्यादी वैज्ञानिक उपकरणांच्या आधारे सिद्ध करून दाखवत आहेत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले