भाजपचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांच्यावर गुन्हा नोंद !
मालवणी येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीत मशिदीच्या समोरून जातांना ध्वनीक्षेपक लावल्याचे प्रकरण
|
मुंबई – मालवणी येथे रामनवमीच्या मिरवणुकीच्या वेळी मशिदीच्या समोरून जात असतांना ध्वनीक्षेपक लावल्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाचे नेते तेजिंदरसिंह तिवाना आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्यासह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ‘या मिरवणुकीची अनुमती घेण्यात आली नव्हती’, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ‘मशिदीसमोर हिंदूंनी गोंधळ घातला’, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. (हिंदूंनी मिरवणुकीची अनुमती घेतली नसेल, तरी ती घ्यायला हवी होती; पण ‘धर्मांधांनी केलेल्या अशा किती अवैध घटनांमध्ये पोलीस तत्परतेने त्यांच्यावर कारवाई करतात ?’, हेही त्यांनी सांगायला हवे ! – संपादक)