कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत ६१ टक्के मतदान !
कोल्हापूर, १२ एप्रिल (वार्ता.) – कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी १२ एप्रिल या दिवशी चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव, तर भाजपकडून सत्यजित कदम हे निवडणूक लढवत आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा ६१.१९ टक्के मतदान झाले होते.