(म्हणे) ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचा प्रयत्न चालू !’ – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

  • मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावतील म्हणून अफझलखानवधाचे चित्र काढणारे, आता काश्मिरी हिंदूंवरील अत्याचार दाखवणार्‍या चित्रपटालाही आक्षेपार्ह ठरवत आहेत. मुसलमानांच्या धार्मिक भावना दुखावू नयेत, यासाठी हिंदूंनी मिरवणुका काढायच्या नाहीत, ‘जय श्रीराम’च्या घोषणा द्यायच्या नाहीत, असेच गृहमंत्र्यांना वाटते का ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील ही स्थिती लज्जास्पद ! – संपादक
  • वर्षानुवर्षे धर्मांधांनी केलेल्या घोर अन्यायाविषयी हिंदू जागृत होत असतांना गृहमंत्र्यांना तो ‘तणाव’ वाटतो, हे लक्षात घ्या ! – संपादक
दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

मुंबई – ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हिंदु-मुसलमान यांच्यात तणाव वाढवण्याचे प्रयत्न चालू आहेत, असे अनुमान आहे. याविषयी अन्वेषण चालू आहे, असे वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केले.

 (सौजन्य : ABP MAJHA)

श्रीरामनवमीला मानखुर्द येथे हिंदू-मुसलमान यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर वळसे-पाटील यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

‘मुंबईमध्ये २ गटांत झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणाची चौकशी चालू असून त्यावर भाष्य करणार नाही’, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले. (धर्मांधांनी केलेल्या दंगलीवर भाष्य न करणारे गृहमंत्री हिंदूंविषयी मात्र भाष्य करतात, हाच त्यांचा सर्वधर्मसमभाव आहे का ? – संपादक)