जोडा (ओडिशा) येथे श्रीरामनवमीच्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण
अशा घटना रोखण्यासाठी हिंदूंना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही ! – संपादक
भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशा राज्यातील क्योंझर जिल्ह्यात असलेल्या जोडा शहरामध्ये श्रीरामनवमीच्या दिवशी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून आक्रमण करण्यात आले. यानंतर येथे जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
#Odisha
Communal clash in #Joda over #RamNavami flagSeveral cops, scribes injured; many houses and vehicles vandalised @Siba_TNIE @NewIndianXpress https://t.co/RXd18bkbZI pic.twitter.com/5UcjwSNAqY
— TNIE Odisha (@XpressOdisha) April 12, 2022
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हिंदू श्रीरामनवमीनिमित्त मिरवणूक काढू इच्छित होते; मात्र पोलिसांनी याला अनुमती नाकारली. त्यांनी केवळ ५ सदस्यांना मिरवणूक काढण्याची अनुमती दिली. त्यानंतर हिंदू भगवा झेंडा घेऊन प्रभाग क्रमांक ४ येथील शिवमंदिराजवळ पोचले असता धर्मांधांनी त्यांचा मार्ग रोखला. त्यांनी हिंदूंशी वाद घालण्यास चालू केले. त्यांनी हिंदूंवर आक्रमण केले. त्यांच्यावर काचेच्या बाटल्या फेकल्या. यात काही जण घायाळ झाले. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी दगडफेक केली. नंतर दुकानांची तोडफोड केली. काही दुचाकी आणि चारचाकी यांना आग लावली. या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ४ घंट्यांच्या हिंसाचारानंतर ही स्थिती नियंत्रणात आली.