देशातील ८ शहरांत वर्ष २००५ ते २०१८ या काळात वायूप्रदूषणामुळे १ लाख लोकांचा मृत्यू !

विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीचाच हा परिणाम आहे ! – संपादक

नवी देहली – एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार भारतात वर्ष २००५ ते २०१८ या काळात ८ शहरांमध्ये वायूप्रदूषणामुळे १ लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ आणि युरोपीय अंतराळ यंत्रणा यांच्याकडून मिळालेल्या माहितीद्वारे हा अभ्यास करण्यात आला.

भारतातील ८ शहरांमध्ये कोलकाता, कर्णावती, सूरत, मुंबई, पुणे, भाग्यनगर, बेंगळुरू आणि चेन्नई यांचा समावेश आहे.