देवघर (झारखंड) येथे ‘रोप-वे’च्या अपघातात दोघांचा मृत्यू
तारांमुळे बचावकार्यात अडचण ! Î अडकलेल्या ४८ लोकांपैकी १२ जणांची सुटका !
(रोप-वे म्हणजे एखादे साहित्य किंवा प्रवासी यांच्या वाहतुकीसाठी केलेली व्यवस्था. सामान्यतः डोंगराळ भागात ही वापरली जाते.)
रांची (झारखंड) – राज्यातील देवघर येथील त्रिकुट पर्वतावर ‘रोप-वे’ची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. सैन्य, हवाई दल आणि ‘राष्ट्रीय आपत्ती प्रसारण दल’ (‘एन्.डी.आर्.एफ’) हे बचावकार्य करत आहेत. शेवटची बातमी हाती आली, तोपर्यंत १२ भाविकांची सुटका करण्यात आली होती. अजूनही हवेत लटकलेल्या ट्रॉलीमध्ये ३६ जण अडकले आहेत. तारांच्या जाळ्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.
१० एप्रिलच्या सायंकाळी झालेल्या अपघातानंतर १८ ‘ट्रॉलीज’मध्ये ४८ भाविक अडकले होते. या अपघातात १२ जण घायाळ झाले आहेत. रात्रभर ‘रोप-वे’च्या ट्रॉलीत बसून लोक हवेत लटकत होते.
अन्न पोचवण्याचा प्रयत्न !
रात्री उशिरा केबिनमध्ये अडकलेल्या काही लोकांपर्यंत अन्नाची पाकिटे पोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.