कोरोना संपलेला नाही, तो कधीही परत येऊ शकतो ! – पंतप्रधान मोदी
नवी देहली – कोरोना हे एक मोठे संकट होते आणि ते संकट संपले आहे, असे आम्ही म्हणूच शकत नाही. आता जरी तो नसला, तरी ‘तो पुन्हा कधी येईल’, हे आम्हाला ठाऊक नाही. हा एक ‘बहुरूप’ घेणारा आजार आहे. तो कधीही परत येऊ शकतो, अशी चेतावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ते गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील वंथली येथे माँ उमिया धामच्या महोत्सव कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्गाच्या बाबतीत पुन्हा एकदा दक्षता बाळगण्याचा इशारा दिला आहे.
यासह #विविधभारतीपुणे केंद्रावरील #ठळकबातम्या खालील लिंकवर….https://t.co/labAiJxspA via @YouTube
— AIR News Pune (@airnews_pune) April 11, 2022
Jai Umiya Mata! Addressing the 14th Foundation Day celebration at Umiya Mata Temple in Junagadh, Gujarat. https://t.co/95c07uy866
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2022
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या आजारापासून रक्षण करण्यासाठी लोकांना लसींचे जवळपास १८५ कोटी डोस दिले गेले. आपण एवढा मोठा टप्पा गाठला, याविषयी जग आश्चर्य व्यक्त करत आहे; परंतु तुमच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले आहे.