श्री गुरुदेवा, तुमचा हात राहू दे माझ्या शिरी ।
श्री गुरुदेवा,
माझे मस्तक तुमच्या चरणी ।
तुमचा हात राहू दे
माझ्या शिरी ।। १ ।।
जीवन आहे एक प्रवास ।
तुमच्या चरणांचा हा दास ।। २ ।।
या प्रवासात पाप
अन् पुण्य किती ।
नाही त्याची गणती ।। ३ ।।
जसे प्राक्तन तसा भोग भोगला ।
आता इच्छा नाही जगण्याची ।। ४ ।।
सर्व सुख-दुःख भोगले ।
करुणा येऊ द्या या दीनाची ।। ५ ।।
हसत हसत मिळावी मुक्ती ।
सर्व साधक सुखी असावेत, हीच अपेक्षा उरी ।। ६ ।।
– श्री. सुधाकर के. जोशी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के) (वय ९२ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.२.२०२०)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |