जे.एन्.यू.मध्ये श्रीरामनवमीची पूजेवरून अभाविप आणि साम्यवादी विद्यार्थी यांच्यात हाणामारी !
अनेक विद्यार्थी घायाळ
जे.एन्.यू. विश्वविद्यालयामध्ये राष्ट्रघातकी आणि हिंदुद्वेषी विचारसरणीचे विद्यार्थी आणि शिक्षक यांची संख्या अधिक आहे. काँग्रेसच्या राज्यात अशांना प्रोत्साहन देण्यात येत होते. आता भाजपच्या राज्यात त्यांना प्रखर विरोध होऊ लागला आहे. त्यातूनच गेल्या काही वर्षांत येथे संघर्षाच्या घटना घडत आहेत. केंद्र सरकारने आता या विश्वविद्यालयाला देण्यात येणारे कोट्यवधी रुपयांचे अनुदान रहित करून त्यांना पोसणे बंद करावे, असेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना वाटते ! – संपादक
नवी देहली – जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये (जे.एन्.यू.मध्ये) १० एप्रिलच्या रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि साम्यवादी विचारसरणीची विद्यार्थी संघटना यांच्या विद्यार्थ्यांमध्ये श्रीरामनवमीच्या पूजेवरून हाणामारी झाली. यात ६ विद्यार्थी घायाळ झाले. या हाणामारीच्या घटनेचा एका व्हिडीओ प्रसारित झाला आहे. मारहाण करणार्या आणि गोंधळ घालणारे यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनांनी वसंत कुंज पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले.
Leftist students pelt stones at Ram Navmi Pujan in JNU, blame ABVP for creating a ruckus in a mess over non-veg foodhttps://t.co/zWmU1M9E40
— OpIndia.com (@OpIndia_com) April 11, 2022
१. अभविपच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार श्रीरामनवमीच्या पूजेचे आयोजन केले असता त्या ठिकाणी साम्यवादी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी येऊन आंदोलन केले. याच रागामधून दोन्ही संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आणि मारहाण करण्यात आली. दोन्ही गटांमधील काही लोकांना किरकोळ मार लागला आहे.
२. विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्षा सारिका हिने म्हटले, ‘जे.एन्.यू.मध्ये अभविपच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मांसाहार बंदीला विरोध केल्याने हा गोंधळ झाला. यात ६० जण घायाळ झाले.’
सौजन्य हिंदुस्थान टाईम्स
३. अभविपच्या जे.एन्.यू.मधील संघटनेचे अध्यक्ष रोहित कुमार यांनी म्हटले, ‘साम्यवादी विद्यार्थ्यांनी श्रीरामनवमीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पूजेमध्ये गोंधळ घातला. या गोंधळाचा मांसांहारी जेवणाशी कोणताच संबंध नाही. त्यांना श्रीरामनवमीच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाविषयी अडचण होती.’
४. या घटनेविषयी विश्व हिंदु परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी म्हटले, ‘काही विद्यार्थी श्रीरामनवमीच्या निमित्ताने पूजा करत असतांनाच साम्यवादी विचारांच्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन चालू केले. त्यामुळे झटापट झाली.’