उत्तरप्रदेशातील मेरठ येथे दागिने घातलेली ‘लाडू गोपाळ’ची मूर्ती चोरट्यांनी पळवली !
मेरठ (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील कंकरखेडा येथे नुकतीच ‘लाडू गोपाळ’ची मूर्ती चोरांनी पळवली. ६ किलो वजनाच्या या पितळ्याच्या मूर्तीला सोन्या-चांदीचे दागिने घातले होते.
मेरठ: बदमाशों ने लूटी गहने पहने लड्डू गोपाल की मूर्ति, टोकरी में थी छह किलो वजनी मूर्ति, थे सोने-चांदी के गहने#MeerutNews #MeerutCrimeNews #UPPolice #UttarPradeshNewshttps://t.co/YBXdpvMvkl
— Dainik Jagran (@JagranNews) April 11, 2022
कंकरखेडा येथील सैनिक विहार येथे रहाणार्या रिता राठी नावाची महिला घरातून शिव मंदिरात पूजा करण्यासाठी जात होती. रिता यांच्या हातात सोन्या-चांदीचे दागिने घातलेली लाडू गोपाळची मूर्ती होती. वाटेत दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या हातातून भ्रमणभाष आणि मूर्ती हिसकावून घेऊन पळ काढला. (दिवसाढवळ्या अशा प्रकारे भाविकाच्या हातातील मूर्ती चोरणार्यांना पकडून त्यांना कठोर शिक्षा करा ! – संपादक)