हल्दानी (उत्तराखंड) येथे राष्ट्रध्वजाने सायकल स्वच्छ करणार्या रफीकला अटक !
राष्ट्रध्वजाला जाळून अथवा फाडून किंवा अन्य प्रकारे त्याची विटंबना करणारे धर्मांधच असतात, हे उघड सत्य आहे. अशा राष्ट्रद्रोही विकृतीच्या विरोधात वेळीच कठोर कारवाई व्हायला हवी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! – संपादक
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून सर्वांना वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
देहरादून (उत्तराखंड) – राज्यातील हल्दानी येथे ‘रफीक’ नावाच्या धर्मांधाने त्याच्या सायकलदुरुस्तीच्या दुकानात सायकल स्वच्छ करण्यासाठी राष्ट्रध्वजाचा वापर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
(सौजन्य : Viraj Hindustani)
यासंदर्भातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने स्थानिक राष्ट्रभक्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
Man arrested for using tricolour to clean bicycles https://t.co/SvIud8ooMC
— TOI India (@TOIIndiaNews) April 9, 2022
त्यानंतर पोलिसांनी रफीकला अटक केली. रफीकचे ‘रफीक साइकिल वर्क्स’ नावाचे दुकान आहे. राष्ट्रध्वजाच्या अपमानाच्या आरोपामध्ये पोलिसांनी रफीकवर ‘राष्ट्रीय गौरव निवारण अधिनियमा’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.